कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धेत कणकवलीतील एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरचे घवघवीत यश

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन (रिजनल लेव्हल) स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत कणकवली येथील एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या २१ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली, तसेच ११ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट परफॉर्मर’ गोल्ड मेडल मिळाले.
अबॅकस स्पर्धेत कु. भौमिक संदीप अंधारी (दुसरा क्रमांक), कु. भाग्येश विवेक सावंत (चौथा क्रमांक), कु. जयेश सचिन पाटील (पाचवा क्रमांक) यांनी क्रमांक पटकावला. याशिवाय वेदा आनंद सावंत, स्वरा विजय परब, जागृती पांडुरंग खरात, मधुरा विजय परब, जय पांडुरंग खरात, अंश नारायण राठोड, देविका मनोज तावडे, तनया योगेश पवार, रियांश राकेश चव्हाण, रणजित शैलेश गावकर, दुर्वांक निलेश राणे यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले.
वैदिक मॅथ्स स्पर्धेत कु. नंदिनी मनीष राणे (प्रथम क्रमांक), कु. अनय संजय सावंत (द्वितीय क्रमांक), कु. स्विझल नॅपसन डिसोजा (तृतीय क्रमांक), कु. तुबा ऐयाज शेख (चौथा क्रमांक), कु. उमैझा रफिक शेख (पाचवा क्रमांक), कु. गार्गी विनोद तांबे (सहावा क्रमांक), कु.नारायण रमेश रणशूर (सहावा क्रमांक) पटकावून ट्रॉफीचे मानकरी ठरले.
तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण,आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले असून, या यशाबद्दल सर्वच स्तरातून विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशामागे एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या संचालिका सौ.पूजा राणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व पालकांचे सहकार्य, प्रोत्साहन व विश्वास यामुळेच हे शक्य झाले आहे.
जगभरात अबॅकसचा वापर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी प्रभावी माध्यम म्हणून केला जातो, विशेषतः ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अबॅकस प्रशिक्षण घेतल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, वेगवान गणना क्षमता यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तसेच वैदिक मॅथ्स शिकल्याने मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वाढ होऊन गणिताबद्दलची भीती दूर होते. आत्मविश्वास वाढीस लागतो, स्मरणशक्ती वाढते. तसेच अवघड व क्लिष्ट गणिते काही सेकंदात सोडवता येतात. स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचवण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी आहे.





