पिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी

मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती.

error: Content is protected !!