तळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या

तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (29) हिने गुरूवारी सकाळी 9.23 वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
याबाबतची खबर तिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांना दिली.
गुरूवारी सकाळी दुर्गा खटावकर हिचे सासरे रंजन खटावकर आणि पती देवेंद्र हे त्यांच्या हॉटेलमध्ये गेले होते. तर सासू काही कामानिमित्त कोल्हापूरला गेली होती. घरात सकाळी दुर्गा आणि तिच्या दोन मुली होत्या. सकाळी 9.23 वा. च्या सुमारास रंजन खटावकर यांची नात सान्वी हिने त्यांना फोन करून आईने घराच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीत गळफास लावून घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर ही घटना समजली. याप्रकरणी तपास कणकवली पोलिस करत आहेत.
कणकवली प्रतिनिधी





