ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने व्यवहारात करून जीवन सुकर करा – जयंत फडके

न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
मिळवलेले ज्ञान केवळ तराजूत न तोलता ते योग्य प्रकारे व्यवहारात उतरवून जीवन सुकर करा.आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे असे मत जेष्ठ पत्रकार जयंत फडके यांनी आचरा हायस्कूल येथे व्यक्त केले.
धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना स्तंभलेखक, पत्रकार व प्रसिद्ध वक्ते जयंत गोपाळ फडके हे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ कदम तसेच काही कृषी तज्ज्ञ (रत्नागिरी) रानडे सर, स्थानिक स्कूल समिती सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी
गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ. सोमनाथ कदम यांनी इयत्ता दहावीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकासाठी विशेष बक्षीस जाहीर केले. तसेच त्यांनी आपल्या स्वलिखित तीन पुस्तकांची भेट शाळेच्या ग्रंथालयाला दिली
या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष राज जे. एम. फर्नांडिस सर, बी. एम. एस. आणि बी. कॉम. कॉलेज अध्यक्ष संजय मिराशी, शिवराम उर्फ दाजी गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र अध्यक्ष रघुनाथ पाटील, संस्था सदस्य राजन पांगे, मा. श्री. बाबाजी भिसळे गुरुजी, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. घुटुकडे सर, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका फर्नांडिस मॅडम, बी. एम. एस. कॉलेजचे प्रिन्सिपल मा. श्री. सारंग सर, सहाय्य्क पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आचरा हर्षाली पाटील, पोलीस श्री. मनोज पुजारे, आचराचे प्रसिद्ध लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषद (मालवण) अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी, योगशिक्षक अशोक कांबळी धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षातील वार्षिक अहवालाचे वाचन सौ. कदम मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका सौ. माणगांवकर मॅडम यांनी नेटकेपणाने केले. पारितोषिकांचे वाचन श्री. साटेलकर एस. एन. , सौ. गोसावी मॅडम, सौ. कदम मॅडम व सौ. रावले मॅडम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. घुटुकडे सर यांनी मानले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. नृत्य, गीत, व इतर सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य मोलाचे ठरले.





