शिल्पा गावकर डोंगरे हिचा गाऊडवाडी ग्रामस्थांतर्फेे सन्मान

दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या वतीने आचरा गाऊवाडीतील सुकन्या,शिल्पा गोविंद गावकर डोंगरे हिने महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळताना भोपाळ उमंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल स्पर्धेत झारखंड संघाच्या विरोधात उत्कृष्ट कामगिरी करून उमंग ट्रॉफी महाराष्ट्राला जिंकून देण्यात मोठे योगदान दिले होते. या स्पर्धेत तिने उपकप्तान म्हणून काम पाहिले. या निमित्ताने आचरा गाऊवाडी येथील श्री संभादेवी मंदिरात, श्री संभादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तिचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंडळाचे कार्यकर्ते सुरेश रावजी गावकर आणि आबा गावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व रोख रुपये 1000 देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या सोबत सुरेश गावकर, जयश्री गावकर, प्रणाली पांगे, सुनंदा गावकर, सुनील मालवणकर, उमेश अनंत गावकर, प्रशांत पांगे, अनिल शिवलकर, शैलेश नाईक, उदय गांवकर, विनय नाईक यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जयश्री गावकर, प्रणाली पांगे, सुनंदा गावकर यांनी तीचे औक्षण केले. अध्यक्ष सुरेश रामचंद्र गांवकर यांनी मंडळाच्या वतीने तीचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. सुनील मालवणकर, उमेश अनंत गावकर, प्रशांत पांगे, अनिल शिवलकर, शैलेश नाईक, उदय गांवकर,विनय नाईक यांनीही तिच्या कार्याचा गौरव करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना शिल्पा डोंगरे हिने क्रिकेट क्षेत्रात आपली वाटचाल कशी झाली ते सांगत, आपल्या या यशात तिच्या पतीचा मोठा वाटा असल्याचे सांगत, सर्वांचे आभार मानले.





