केंद्रशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी जयप्रकाश परुळेकर यांची फेर निवड, उपाध्यक्ष पदी दिपाली कांबळी

केंद्र शाळा आचरे नं. 1 च्या पालक प्रतिनिधीची आयोजित सभेत उपस्थित सदस्यांमधून जयप्रकाश कृष्णाजी परूळेकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेर निवड करण्यात आली. तसेच श्रीम. दिपाली जितेंद्र कांबळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या सभेस विष्णु भाटकर, संदीप पांगम, संतोष मेस्त्री, विलास आचरेकर, श्रीम. अर्पिता घाडी, श्रीम. सुजाता कामतेकर, श्रीम. प्राजक्ता घारे श्रीम. अनिता पाटील, सिध्देश हळवे आदी सदस्य तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. जयप्रकाश परुळेकर यांच्या फेर निवडीबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.





