कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश

पाटकर वर्दे कॉलेज आयोजित कला उत्सवामध्ये विविध कला प्रकारात पाट हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग, निबंध स्पर्धा असे विषयाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पाट हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी सर्वच कलाप्रकारात यश मिळविले.
ऋग्वेद कुसाजी कांबळी, प्लेट पेंटिंग प्रथम क्रमांक अथर्व जगदीश गोसावी, रिल्स मेकिंग मध्ये प्रथम सोहनी संदीप साळसकर, रिल्स मेकिंग मध्ये द्वितीय दीक्षा दिनेश मराळ, हिने एकपात्री अभिनयामध्ये द्वितीय भूमि कृष्णा गावडे, निबंध लेखन स्पर्धा तृतीय तर गौरी ज्ञानेश्वर राणे हीने निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक पटकवला.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था आणि विद्यालयातर्फे करण्यात आले. एसके पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशीचे कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, कला शिक्षक संदीप साळस्कर, शिक्षक प्रतिनिधी विजय मेस्त्री यांच्या तर्फे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेसाठी शिला सामंत मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!