माकडांच्या बंदोबस्तासाठी उद्या (९) कुडाळात पिंजरे लावणार

ठाकरे सेना व युवा सेनेच्या मागणीची वन विभागाकडून दखल
कुडाळ शहरात आता वन विभागाकडून माकड पकड मोहीम राबवली जाणार आहे. शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाकरे सेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी वन विभागाची भेट घेतली होती त्याची दखल वन विभागाने घेतली असून ९ डिसेंम्बर पासून सांगिर्डेवाडी येथे माकडांचे पिंजरे लावण्यासाठी येणार आहेत.
शहरात होत असलेल्या माकडांच्या त्रासाबद्दल कुडाळ शहर शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वनपाल श्री सावंत यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी कुडाळ शहरातील माकडांचा त्रास कमी करण्याबाबत व नुकसान भरपाई बाबत सकारात्मक चर्चा देखील झाली होती.
त्याचाच भाग म्हणून मंगळवार दिनांक ९ डिसेंबर रोजी वनाधिकारी सचिन पाटील व इतर कर्मचारी सांगिर्डेवाडी येथे माकडांचे पिंजरे लावण्यासाठी येणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचा पंचनामा देखील करण्यात येणार आहे.
सांगिर्डेवाडी येथील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी जगदीश राणे यांच्या घरी सकाळी 10:30 वाजता जमावे असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाठ व अमित राणे यांनी केले आहे.
हे काम होण्यासाठी राजन नाईक, संतोष शिरसाठ,सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, प्रथमेश राणे, दशरथ राणे, रोहन शिरसाठ, विशाल राणे, दीपक राणे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर यांनी विशेष प्रयत्न केले.





