कुडाळ बाजारपेठेतील वीज समस्या सोडविण्याच्या कामांना सुरुवात

ठाकरे सेना आणि युवा सेनेने केला होता पाठपुरावा

कुडाळ शहर बाजारपेठेतील वीज समस्या सोडविण्याच्या ठाकरे सेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे. आजपासून बाजारपेठेतील वीज समस्या सोडविण्याबाबत महावितरणने आवश्यक पाऊले उचलली आहेत. ज्याठिकाणी स्पार्किंग होत त्याठिकाणची कॉपर कंडक्टर बदलण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. या कामाबद्दल बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले
शिवसेना व युवा सेना कुडाळ यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी महावितरणच्या कुडाळ ऑफिसला शहरातील विविध समस्यांबाबत धडक देण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरातील बाजारपेठेतील वीज समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चेत कुडाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही पोलांवर होणारे स्पार्कीग व कमी दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठा व विजेचा खेळखंडोबा यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानुसार ह्या समस्या सोडवण्याबाबत सर्वे करण्यास सांगण्यात आला होते.
त्याची तात्काळ दखल घेत महावितरण अधिकारी व वायरमन यांच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला. या सर्वे मध्ये अशी बाब समोर आली की बाजारपेठेतील पोलांवर असणारे कंडक्टर हे कॉपरचे आहेत आणि कनेक्शन ॲल्युमिनियम वायरचे आहेत. त्यानुसार आज हे कॉपर कंडक्टर बदलण्याचे काम तसेच बाजारपेठेतील इतर लाईट मेंटेनन्सची कामे महावितरणच्या माध्यमातून सुरू झाली.
हे कामे होण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाठ, मेघा सुकी, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, दीनार शिरसाट, नितीन सावंत, शुभम महाडेश्वर, अमित राणे, तेजू वर्दम, अशोक किनळेकर, बाळा राऊळ यांनी विशेष पाठपुरवठा केला. या कामाबद्दल बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले

error: Content is protected !!