जनतेचा आशीर्वाद पक्का! सावंतवाडीत नगरपालिकेत विरोधकांना भाजपा २१-० ने व्हाइट वॉश देणार!!

नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदासाठी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शनासह भाजपा उमेदवारांनी आज निवडणूक अर्ज केले दाखल!

सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. अमाप उत्साहात आणि विजयाच्या विश्वासासह भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड शक्ति प्रदर्शन करत हे अर्ज आज सावंतवाडी नगरपालिका येथे भरण्यात आले.

अगदी अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा इम्पॅक्ट आज स्पष्ट दिसून येत होता.

केंद्रापासून राज्यापर्यंत आणि राज्यापासून ते होऊ घातलेल्या उद्याच्या नगरपालिका निवडणुकीपर्यंत हीच यशाची घोडदौड सुरू राहिल असा विश्वास भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला विकासाकडे नेण्यासाठी सुरु मोहीम महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशोशिखरावर नेली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण, खासदार नारायणराव राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे या सर्वांच्या व्हिजनरी नेतृत्वातून आणि प्रत्येक शहराला राज्याच्या विकासाशी जोडण्याच्या धोरणातून सावंतवाडीकर नागरिकांच्या स्वप्नांची निश्चितच पूर्तता होईल, समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने सावंतवाडी नगरपालिका ही राज्यात आदर्श घडवून दाखवणार असा विश्वास यावेळी श्री. विशाल परब यांनी व्यक्त केला. आमची कोणाशीही स्पर्धा नाही किंवा राजकीय वैर नाही, या सावंतवाडी शहराची ती संस्कृतीही नाही. मात्र आता नाही तर कधीच नाही या ईर्षेने यावेळी आम्ही सर्वजण या निवडणुकीत पूर्ण ताकदीने एकदिलाने उतरलो आहोत, सर्व भाजपा नेते मंडळींची या परिवर्तनाच्या लढाईसाठी साथ आहे आणि म्हणूनच, आमच्या विरोधात कोण आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. सावंतवाडीच्या विकासात आता जनतेला जराही तडजोड नको आहे, म्हणूनच या निवडणुकीत जनताच सर्वच्या सर्व भाजपा विरोधकांना २१-० ने व्हाईटवॉश देणार आहे, असे यावेळी श्री. विशाल परब यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!