पांडुरंगाचा रथ बनविणाऱ्या सिद्धेश नाईक याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या रथाचे केले काम

कुडाळ शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या सागवानी रथाचे काम पाच नोव्हेंबर रोजी पूर्ण करून विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण केले. ही विशेष कामगिरी करणारे सिद्धेश नाईक हे कुडाळचे सुपुत्र आहेत. त्यांचा सन्मान ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
हा रथ संपूर्ण सागवानी असून सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा सागवान वृक्ष वापरण्यात आला आहे. साधारण २०१९ मध्ये मुख्य गाभाऱ्यातील ऋग्वेद या वेद ग्रंथाच्या लाकडीपेटीचे काम देखील सिद्धेश नाईक यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले होते.
या रथाची लांबी १५ फूट, रुंदी ६.५ फूट व उंची १५ फूट असून रथाचा प्रवास बैल जोडीने होईल. संपूर्ण रथाचे वजन दोन टन आहे आणि विशेष म्हणजे विठ्ठल मंदिर समितीचा हा पहिलाच रथ आहे. या रथाचे काम कुडाळचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी केले हे विशेष. या रथाच्या खांबावर जय विजय ची मूर्ती आहे व रथाच्या वरील बाजूस गरुड हनुमंत आहेत. रथाला आठ खांब असून तीन कळस आहेत.
ही विशेष कामगिरी करणारे सिद्धेश नाईक हे कुडाळचे सुपुत्र असल्याने त्यांचा सन्मान नगरसेवक मंदार शिरसाठ, सुशील चिंदरकर, नितीन सावंत व अमित राणे यांनी कुडाळ शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.

error: Content is protected !!