कणकवली नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधून आकांक्षा अभय राणे भाजपकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

माजी नगरसेवक अभय राणे यांची माहिती

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकी करिता प्रभाग क्रमांक नऊ मधून आकांक्षा अभय राणे या भाजपाकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती माजी नगरसेवक अभय राणे यांनी दिली. प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. राणे यांनी केले आहे. दरम्यान याच प्रभागामधून भाजपाच्या मेघा महेश सावंत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर उद्या या दाखल होणाऱ्या या दुसऱ्या उमेदवारी मुळे भाजपाच्या तूर्तास दोन उमेदवार या ठिकाणी रिंगणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी भाजपाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!