टोपीवाला वाचनालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला.
सन २०२५ हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांचे जन्म शताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे. आज १५ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन राज्यभर साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने सर्व शैक्षणिक संस्थांना साजरा करण्याचे कळविले आहे.
भगवान विरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, सहकार्यवाह श्री. भार्गवराम धुरी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. मंगेश मसके श्री गिरीश शिरसाट ग्रंथपाल राजन पांचाळ कर्मचारी आणि वाचक वर्ग उपस्थित होते.





