अखेर कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर लढणार

सर्व पक्षांसोबत भाजपने देखील भ्रष्टाचारा विरोधात शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असतानाच श्री. पारकर यांनी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मी लढणार असून सर्वच पक्षांना सोबत घेत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई देत असताना भाजपने देखील या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. त्यामुळे संदेश पारकर गेले अनेक दिवस असलेले मौन आता सुटले असून आता यापुढे कणकवली शहर विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





