जानवली लिंगेश्वर पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 19 नोव्हेंबर रोजी

‘ताटाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानवलीच्या श्री लिंगेश्वर पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
श्री लिंगेश्वर पावणादेवी जागृत देवस्थान असून हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, म्हणून या देवतेची सर्वत्र ख्याती आहे.
यानिमित्त रात्री दिंडी प्रदक्षिणा, त्यानंतर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या मंदिराला करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर अधिकच आकर्षक दिसतो. या जत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!