ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची भूमिका आज स्पष्ट होणार

कणकवलीत सायंकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची आज सायंकाळी कणकवलीतील हॉटेल मुद्रा येथे 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. गेले काही दिवस संदेश पारकर यांची भूमिका काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संदेश पारकर आता कोणता निर्णय घेणार? संदेश पारकर आजच्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करणार का? की या पत्रकार परिषदेत धक्का तंत्र अवलंबणार? यासह अनेक प्रश्न त्यांच्या या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी श्री. पारकर यांची पत्रकार परिषद जाहीर करण्यात आली होती. परंतु वैयक्तिक कारणामुळे ही पत्रकार परिषद रद्द केल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत पारकर कोणती घोषणा करणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!