कणकवलीत राजकीय हालचालींना वेग ! समीर नलावडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार:पॅनेलवर सर्वांची नजर.

तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी

कणकवली/दिगंबर वालावलकर.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आजचा दिवस राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरत आहे.भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे हे आपल्या पॅनेलमधील नऊ ते दहा नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह आज तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
इतर कोणते उमेदवार कुठल्या वॉर्डातून रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरातील नागरिकांमध्ये आणि विविध राजकीय मंडळींमध्ये या यादीबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान,तहसीलदार कार्यालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांची वाढती गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.निवडणुकीचे राजकीय रंग दिवसेंदिवस गडद होत असताना आगामी तासांत अधिक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!