शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड

संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी वैभव नाईकांच्या दिली खांद्यावर

मातोश्री वरील बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली निवड जाहीर

वैभव नाईक यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांची यांची निवड आज मातोश्री वरील जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली मातोश्रीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी ही बैठक घेण्यात आली. विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीकरिता देखील माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी वैभव नाईक यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी या बैठकीत केली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीवेळी माजी खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जान्हवी सावंत, उपनेते गौरीशंकर खोत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल वैभव नाईकांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!