सावंतवाडी शहरातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता कमलाकर धुरी कडून प्रवेशद्वार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदान

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता कमलाकर धुरी यांजकडून शाळेस सुंदर, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदानकरण्यात आले.
बाल आनंद मेळाव्यानिमित शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता धुरी व त्यांचे पती श्री.कमलाकर धुरी यांच्या शुभहस्ते शाळेस सुंदर व भव्य प्रवेशद्वार प्रदान करण्यात आले.
यावेळी अनंत शास्त्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान गुरव सर, मानवाधिकार संस्थेचे पदाधिकारी श्री.अमित वेंगुर्लेकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा श्रीम.गुंजन गावडे, श्री.परांजपे सर, व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक श्री केशव जाधव, श्रीम.लक्ष्मी धारगळकर मॅडम, श्रीम.प्रणिती सावंत मॅडम, श्री.अमर पाटील सर , विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीम.कविता धुरी व श्री.कमलाकर धुरी दांपत्याचा व श्री.संतोष तळवणेकर यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!