खारेपाटण जि. प. साठी भाजपाकडून आरती गाठे इच्छुक

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी पार पडली. आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे.सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) करीता जाहीर झाला आहे.यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या पदरात निराशा पडली आहे. तर नव्याने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना एक प्रकारची चांगली संधी चालून आल्याने या जि. प. सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग दाखवला आहे. जि. प निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. खारेपाटण जि. प. मतदार संघातून महायुती मधील भाजपा पक्षाकडून आता इच्छुक महिला उमदेवारांच्या नावाची चर्चा होतं आहे. यामध्ये आता खारेपाटण येथील महिला उमेदवार म्हणून आरती गाठे यांनी सुद्धा आपली इच्छा व्यक्त केली असून. “आरती गाठे यांनी,मीही जि. प. सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येतं आहे”.तसेच पक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेईल त्याच्याशी सहमत असल्याचे देखील सौ.गाठे यांच्याकडून सांगण्यात येतं आहे. तरी सध्या खारेपाटण मधून सरपंच- प्राची देवानंद इस्वलकर, माजी. पं. समिती सदस्या -तृप्ती किशोर माळवदे, महिला तालुका कार्यकारणी सदस्या -उज्वला वीरेंद्र चिके, माजी ग्रा. पं. सदस्या -अंजली सुधीर कुबल, तसेच कीर्ती संकेत शेट्ये या नावांची चर्चा जि. प. सदस्य (ना. मा. प्रवर्ग )पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच महायुती मधील शिंदे शिवसेना पक्ष यांच्याकडून सध्यातरी कोणताही उमेदवाराच्या नावाची चर्चा झाली नसून पक्षाचे वरिष्ठ जे काही निर्णय देतील त्यावर आमची पुढची भूमिका स्पष्ट दिसेल तसेच महायुती म्हणून भाजपा च्या उमेदवारांनाही आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे मत शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश गुरव यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर खारेपाटण जि. प. मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सध्या जि. प. सदस्य पदाच्या निवडणुकीच्या महिला उमेदवार म्हणून मनस्वी महेश कोळसूलकर या इच्छुक असून या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. अश्या प्रकारे खारेपाटण जि. प. मतदार संघातून सध्यातरी महायुती च्या भाजपा पक्षाकडून सहा महिला उमेदवार (ना. मा. प्रवर्ग महिला)इच्छुक असून कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.त्यामुळे सध्याच्या घडीला भाजपा पक्षाकडून सहा महिला उमेदवार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून एक महिला उमेदवार अश्या एकूण सात जि. प. सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक महिला उमेदवारांच्या नावाची चर्चा खारेपाटण जि. प. मतदार संघात सुरु आहे. येत्या काळात या उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळेल किंवा आणखी कोणत्या नवीन उमेदवारांचे नाव निवडणुकीच्या रिंगणात येईल हे सर्व येत्या काळात स्पष्ट होईल.अश्याप्रकारे या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे. काहींचे मतदारसंघ महिला राखीव झाल्यामुळे निराशा ओढवली आहे. या आरक्षण प्रक्रियेनंतर आता इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जि.प. व पं.स. निवडणुका महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? कोण अपक्ष लढणार तसेच कोणी बंडखोरी करून निवडूक लढणार या सर्वांचे चित्र लवकरच येत्या काळात स्पष्ट होईल.





