खारेपाटण पं.स. साठी निशा गुरव इच्छुक

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांना मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे निराशा मिळाली तर नव्या इच्छुक उमेदवाराना सुवर्णसंधी मिळाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात मोडणारे खारेपाटण व तळेरे हे दोन पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण म्हणून जाहीर झाले आहेत. नव्याने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सुद्धा एक प्रकारची संधी चालून आली असल्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत आहेत.यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड सुरू आहे.मात्र निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची असणारी भूमिका तसेच युती आणि आघाडी यांची मोर्चेबांधणी याचा सुद्धा उमेदवारी निवडीवर परिणाम होणार आहे.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण झाल्याने इथे सगळ्याच राजकीय पक्षांचे उमेदवार उभे राहण्यास इच्छुक असून अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत उभे राहण्याची दाट शक्यता त्यामुळे आता पासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे समजते.
“खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ आरक्षण सर्वसाधारण असल्याने भाजपा पक्षाकडून खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत हे निवडणुकी करीता उभे राहणार असल्याचे समजते.तसेच भाजपा चे शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर हे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते.तर आता महिला उमेदवार म्हणून भाजपा पक्षाकडून शेर्पे माजी सरपंच निशा गुरव या देखील इच्छूक असल्याची चर्चा जोरदार चालू आहे. शेवटी पक्ष व वरिष्ठ जो निर्णय देतील त्यावर आम्ही सहमत असल्याचे देखील इच्छूक उमेदवार सांगत आहेत. आहेत भाजपा कडून तळेरे आणि खारेपाटण पं.स. साठी कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव आणि उबाठा शिवसेना पक्षाकडून तालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच देखील नाव चर्चेत आहेत. याबरोबरच तळेरे पंचायत समिती मतदार संघ देखील सर्वसाधारण झाल्याने भाजप तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहे.” त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून युती आणि आघाडीच्या खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील व पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारीचे चित्र लवकरच अधिक स्पष्ट होणार आहे.





