जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता

आचरा रामेश्वर मंदिर येथे देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता ठरला तर उपविजेता ठरला तो साई समर्थ फुगडी संघ आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा 39दिवस चाललेल्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या फुगडी स्पर्धेचे उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी,देवस्थान मानकरी मिराशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,देवस्थान ट्रस्टी मंगेश मेस्त्री,देवूळवाडी ग्रामस्थ दशरथ घाडी, नंदकिशोर सावंत, रवींद्र गुरव, उदय घाडी,परेश सावंत,जितेंद्र राणे,रोहिदास पेंडूरकर,मंदार सरजोशी,रामचंद्र घाडी,गोविंद राणे,नितीन घाडी, अनिकेत घाडी,भाऊ घाडी,संदेश मेस्त्री, लवू घाडी रमेश पुजारे यांसह पुजारे वाडी महिला आदींसह देवूळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यास्तरावरील नऊ संघांनी भाग घेतला होता.यात तृतीय क्रमांक सखी गृप पावशीने मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सौ बागवे मॅडम व संजय केळुस्कर यांनी केले. निवेदन विनिता कांबळी,वर्षा सांबारी आणि कामिनी ढेकणे यांनी केले.या स्पर्धेअगोदर आचरा मर्यादित दम बघु दम स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रात्रौ उशिरा पर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!