बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा १४ ऑक्टोबरला योगशिक्षक पदविका प्रदान समारंभ

जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै बी. एड. कॉलेज या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमापैकी योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम, एम. ए. योगा, एम ए शिक्षण शास्त्र, शालेय व्यवस्थापन पदविका, बहिस्थ बी. एस्सी. हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांमधील योगशिक्षक पदविका शिक्षणक्रमाच्या 2023-24 च्या बॅचचा पदविका प्रदान समारंभ दि. १४ ऑक्टोबर रोजी दु. ३ वाजता होणार आहे.
हा पदविका प्रदान समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली, व कुडाळचे तहसिलदार वीरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.00 वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळच्या सभागृहामध्ये होणार आहे. तरी ‘2023 -24 च्या योग शिक्षक पदविका’ शिक्षणक्रमाच्या बॅच मधील प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली पदविका प्रमाणपत्र स्वीकारावित, असे आवाहन केंद्राचे केंद्रप्रमुख परेश धावडे व केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.





