खारेपाटण ज्यूनियर कॉलेज येथे वन्यजीव सप्ताह संपन्न

वनविभाग सावंतवाडी व वनपरिक्षेत्र कणकवली यांचे आयोजन

वन्यजीव रक्षण व सापांच्या विविध प्रकारच्या प्रजाती याबाबतचे करण्यात आले मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र कणकवली, वनपरिमंडळ फोंडा तसेच सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग यांचे आयोजन तसेच सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने वन्य जीव सप्ताह निमित्त खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वन्यजीव रक्षण व सापांच्या विविध प्रकारच्या प्रजाती याबाबतची मार्गदर्शन कार्यशाळा वनपरिक क्षेत्र अधिकारी श्री सुहास पाटील व सर्प इंडिया सिंधुदुर्ग या टीमचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मंदार जगदीश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
या कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री. संजय सानप, ज्युनियर कॉलेजचे सिनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, प्राध्यापक श्री. दयानंद कोकाटे, यश कॉम्प्युटर अकॅडमी चे संचालक श्री. मंगेश गुरव, वनपरिक क्षेत्र अधिकारी श्री. सुहास पाटील, वन परिमंडळ फोंडा चे वनपाल श्री. धुळू कोळेकर, प्रमुख मार्गदर्शक श्री, जितेंद्र कोर्लेकर, रॅपिड रेस्क्यू टीम कणकवली चे श्री.अंकुश माने, अमोल पटेकर, प्रशांत कांबळे, विजय भोसले, शुभम पाटील, सुदेश पाटील, राजेश भोगले, राजेश डांबरे, भक्ती पिसे, महेश तळेकर, अक्षय म्हसकर, सर्प इंडिया टीम सभासद आणि सर्प इंडिया टीम सिंधुदुर्गचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मंदार राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वन्यजीव सप्ताह निमित्त सर्प इंडिया सिंधुदुर्ग या टीमचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मंदार जगदीश राणे यांनी सापांच्या विविध प्रकारच्या प्रजाती व त्यांचे वर्गीकरण व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यां समोर सादर करून मार्गदर्शन केले.तर वन्यजीव व सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी माणसामध्ये असलेली भीती व गैसमज प्रात्यक्षिक दाखवून दूर केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री. संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मार्गदर्शन कार्यशाळेस प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!