श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरचा “मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार” कै. संदिपभाई पारकर कुटुंबियांना प्रदान

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे उत्साहात संपन्न झाली.

यावेळी संस्थेसाठी भरीव योगदान देणारे, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. संदिपभाई पारकर यांना श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्या वतीने देण्यात येणारा ‘मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार’ त्यांचा सुपूत्र निशांत पारकर यांना वाचनालय अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते कार्यकारीणीच्या उपस्थितीत
प्रदान करण्यात आला.

यावेळी कार्यवाह हेमांगी खोत, खजिनदार सिताराम हडकर, उपाध्यक्ष संतोष पाताडे, ग्रंथपाल तथा सरपंच स्वरा पालकर, हिमाली अमरे, प्रकाश खोत, गोपाळ चिंदरकर, विवेक परब, संदिप परब, सभासद तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक सुर्वे, महेंद्र मांजरेकर, निशांत पारकर, रणजित दत्तदास, चिन्मयी पाताडे, नारायण पाताडे, सुबोध गांवकर, सुरेश साटम, अशोक पाताडे, अरविंद घाडी, लक्ष्मण पाताडे, भालचंद्र गोलतकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह हेमांगी खोत यांनी सूत्रसंचालन सहकार्यवाह सिद्धेश गोलतकर यांनी तर आभार रावजी तावडे यांनी मानले.

error: Content is protected !!