संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी कलमठ मध्ये नरकासुर स्पर्धा

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे

सहभागासाठी नाव नोंदणीचे आवाहन

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री मित्र मंडळ यांच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता कलमठ बाजारपेठ येथे नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून या स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नरकासुरा सोबत कृष्णाची वेशभूषा केलेले पात्र असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. स्पर्धेकरताचे प्रथम बक्षीस ४००० सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस ३००० सन्मानचिन्ह, तृतीय बक्षीस २००० सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस १००० व सन्मानचिन्ह असे असणार आहे. स्पर्धकांनी नावनोंदणी – तेजस लोकरे 9422179596, नितीन पवार -94049 21777, या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष तेजस लोकरे,नितीन पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!