डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व जीवन आनंद संस्थेचा संविता आश्रम पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष रोटैरियन अॅड. राजेंद्र रावराणे, सेक्रेटरी रोटेरीयन सुप्रिया नलावडे, रोटेरीयन दिपकजी बेलवलकर, रोटेरीयन प्रमोद लिमये व रोटेरीयन, डॅा. विद्याधर तायशेटे यांच्या सहकार्यातुन ही स्वच्छता मोहीम पार पाडली.
या उपक्रमात स्टेशन मास्तर श्री.चिपळूणकर, कुडाळ विभागाचे एरिया सुपरवायजर श्री. सामंत, रेल्वे पोलीस निरीक्षक श्री. सुरवाडे, तसेच रेल्वे व पोलीस विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते शैलेंद्र कदम, आशिका राणे, मयुरी लोट, अपर्णा दळवी, महेश लोट, संतोष नाईक यांचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग होता.यावेळी स्वच्छता मोहिमेत परिसरातील घाण, प्लास्टिक कचरा व निर्जीव झाडाझुडपांची सफाई करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी सर्व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक कौतुक केले व आभार मानले. समाजात स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





