एसआरएम कॉलेज मध्ये मोफत सॅप प्रशिक्षण

प्रशिक्षणसाठी १५ मुलांची निवड
विविध कंपन्यांममध्ये मिळते नोकरीची संधी
आजकाल शिक्षण घेतल्यावर लगेच मनाजोगी नोकरी मिळणं काहीसं कठीण असतं. पण अशा काही एनजीओ आणि कंपन्या आहेत कि ज्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ शकतात. यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची त्यांच्या क्वालिफिकेशनवर निवड केली जाते आणि त्यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर विविध कंपन्यांमध्ये सहज संधी उपलब्ध होते. अशा प्रकारच सॅप अर्थात Systems, Applications, and Products in Data Processing प्रशिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यलयात आयोजीत करण्यात आलं आहे. त्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाबरोबरच उत्कर्ष फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे.
३१ डिसेंबर पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये चांगला जॉब सुद्धा उपलब्ध होणार आहे. आज पासून या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यालयात सुरु झालं. यावेळी कामशिप्र मंडळाचे पदाधिकारी महेंद्र गवस, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. अनंत लोखंडे, उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष धीरेंद्र शिरधनकर, प्रा. जाकीरा राजगुरू, प्रा. खेमराज कुबल, डॉ. डी. जी. चव्हाण आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
गेली तीन वर्ष संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सॅप प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या सॅप प्रशिक्षणामध्ये फिको आणि अबाब या दोन कोर्सच प्रशिक्षण दिल जाणार आहे. फिको साठी १५ तर अबाब साठी १२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, हुशारी असेल आणि इंग्रजी संभाषणाचे कौशल्य असेल तर सॅप कोर्सच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच चांगली नोकरी मिळवू शकता. अशा टॅलेंटेड आणि मेहनती मुलांसाठीच संत राऊळ महाराज कॉलेज आणि उत्कर्ष फाउंडेशनचे मोफत प्रयत्न सुरु आहेत.





