प्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत उपकेंद्र खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न

आज दिनांक 20/9/25रोजी प्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत उपकेंद्र खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले.उद्घाटन प्रसंगी खारेपाटण सरपंच-प्राची इस्वलकर, उपसरपंच-महेंद्र गुरव, सर्व सदस्य , माजी सरपंच -रमाकांत राऊत, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र खारेपाटण-डॉ. सूरज बापू कुराणे ,वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र , -डॉ.प्रिया पेडणेकर मॅडम व सर्व आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयसेविका उपस्थित होते. अभियाना दरम्यान उपस्थित रूग्णांना खालील सुविधा देण्यात आल्या.
1.NCD screening
2.ABHA id काढणे

  1. PMJAY card काढणे
    4.गरोदरमाता तपासणी, लसीकरण ,समुपदेशन व MCP Card वाटप
    5.समतोल आहार प्रदर्शन
    6.संशयित क्षय रुग्ण थुंकी तपासणी
    7.फिजिओथेरपी मार्गदर्शन
    8.HLL lab मार्फत रक्त तपासण्या
    9.मोफत किरकोळ औषधे.

या अभियानाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!