खारेपाटण प्रा.आ.केंद्रात रुग्णांना फळे वाटप

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे आज शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. कणकवली तालुका भाजप अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार,भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामकांत राऊत, खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,शिडवणे सरपंच श्री रवींद्र शेट्ये,चिंचवली सरपंच श्री अशोक पाटील,कुरंगावणे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे, वायंगणी सरपंच श्री प्रताप फाटक,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,यांसह भाजप कार्यकर्ते श्री भाऊ राणे,एकनाथ कोकाटे,रवींद्र लाड,शबान मुजावर, शैलेश सुर्वे,दिनेश मद्रस,भरत चव्हाण,संदीप सावंत,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य श्री किरण कर्ले,सौ क्षितिजा धुमाळे,कुरंगावणे ग्रा.पं. सदस्य श्री बबलू पवार,शेखर कांबळे आदी मान्यवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण प्रा.आ.केंद्राचे नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज कुरणे यांचे देखील कणकवली तालुका भाजप अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांनी अभिनंदन केले.या रुग्णालयातील आंतरुग व बाह्यरुग्ण यांना भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष मान.रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रुग्णना फळे वाटप करण्यात आली.यावेळी खारेपाटण प्रा.आ.केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग तसेच आशा स्वानसेविका उपस्थित होत्या.





