आमदार पडळकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-एसपी आक्रमक

कुडाळमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमध्ये पडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याला जोडे मारो आंदोलन करून आणि दहन करत निषेध नोंदवला.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पक्षाचे प्रसाद रेगे, शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर,युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर,सा.बा. पाटकर, उत्तम सराफदार, सचिन पाटकर, नजीर शेख, अशोक कांदे, सुधा सावंत, पुंडलिक दळवी, बावतीस फर्नांडिस, देवेंद्र टेमकर, नंदू साटेलकर, नईम मेमन, अंजला नाईक, दानिश तेहसीलदार, देवेंद्र पिळणकर, उत्तम तेली, महेश चव्हाण, बाळा मसुरकर, संतोष चव्हाण, राजू वाघाटे, रोहित वाघाटे, रमेश रावराणे, प्रीतम रावराणे, तुषार पिळणकर आणि सुजल शेलार यांचा समावेश होता.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही, अशी प्रतिक्रिया देत, अशा प्रकारची भाषा वर्तनात असणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारची विधाने सहन केली जाणार नाहीत, असा इशारा पक्षाच्या वतीने आनंद मिळणार यांनी दिला.
गोपिचंद पडळकर यांनी ज्या अर्वाच्य भाषेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टिका केली,त् या विरोधात सिंधुदुर्ग राष्ट्रवादी एकवटली आणि त्यांच्या पुतळ्याला काळे पासुन जोडे मार आंदोलन केले. महाराष्ट्राने एस.एन.जोशीपासुन बाळासाहेब ठाकरे पर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे, आचाराचे नेते बघितले, पण त्यांनी कधीच महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा सोडलेला नव्हता. पण त्यावेळेपासून भाजप सरकार सत्तेवर आले त्यावेळेपासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादाने अशी काही लोक आहेत ती महाराष्ट्राचं राजकारण खराब करीत आहेत, यामध्ये आ.पडळकर अग्रभागी आहे. दोन महिन्यांपूर्वी विधान भवनात मारामारी सारखा नीच प्रकार या पडळकरने केला होता. परंतू त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता यापुढे हे थांबलं नाही तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला.

error: Content is protected !!