साळिस्ते गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड

कणकवली तालुक्यातील साळिस्ते या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी साळीस्ते गावचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश सखाराम साळीस्तेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
साळीस्ते गावच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच श्री. प्रभाकर ताम्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेत गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश सखाराम साळिस्तेकर यांची सर्वानुमते दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर सरपंच प्रभाकर ताम्हणकर व उपसरपंच जितेंद्र गुरव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून त्याचा विशेष सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच श्री. चंद्रकांत हरयाण, माजी उपसरपंच श्री. मंगेश कांबळे, साळिस्ते बौद्ध विकास मंडळ ग्रामीणच्या अध्यक्षा अनुराधा कांबळे, वैभव कांबळे, श्री. संतोष रांबाडे आदी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
श्री. सुरेश साळिस्तेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारिप उपाध्यक्ष तसेच साळिस्ते बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांचे सर्व समाजात सलोख्याचे, सौजन्याचे संबंध असून तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी दोन वेळा असतांनाही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले होते. त्यांच्या बिनविरोध दुसऱ्यांदा फेरनिवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!