पंचायत समिती वैभववाडी येथे तालुकास्तरीय AI प्रशिक्षण शिबिर संपन्न

मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण आणि श्री सतीश मदभावे यांच्या श्रावणी कम्प्युटर अकॅडमी मार्फत संवाद शैलीत सुमारे 100 कर्मचारी व अधिकाऱ्यांना AI चे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जयप्रकाश परब, वैभववाडी बीडिओ जंगले, डॉक्टर बिराजदार, गट शिक्षणाधिकारी वडार, ग्राम विस्तार अधिकारी जाधव, अधिक्षक श्री. बापू सावंत, संतोष टक्के, सहायक प्रशासन अधिकारी देसाई उपस्थित होते.
AI चा प्रशासना मध्ये प्रभावी वापर कसा करावा हे उदाहरणासह सांगत, दस्त ऐवजचा सारांश, पत्र लेखन, मराठी अनुवाद, टेक्स्ट टू ऑडिओ, टेक्स्ट टू व्हिडिओ, अशा विविध गोष्टी ChatGPT, Canva, Gemini, bhashini, इत्यादि टूल्स वापराचे प्रात्यक्षिक घेतले.
या प्रशिक्षणाचा उपयोग आमच्या प्रशासकीय कामकाजच नक्कीच उपयुक्त ठरेल, तसेच या AI टूल्स मुले आमचे काम अधिक सूर व परिणामकारक ठरेल असे अभिप्राय प्रशिक्षणार्थी दिले.
बीडिओ – जंगले साहेब यांनी प्रास्ताविक केले तर श्री. संतोष टक्के यांनी आभार मानले.





