आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

कणकवली/मयूर ठाकूर
अभ्यासाबरोबरच मुलांची मानसिक एकाग्रता जपण्यासाठी व ती वाढविण्यासाठी भारतीय संस्कृतीची जपणूक होऊन एक आदर्श नागरिक घडविण्याचा दृष्टीने एक प्रेरणादायी व्याख्यान ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वरवडे मध्ये नुकतेच पार पडले या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून प्रमिला महेश्वरी ताई (मध्य प्रदेश) या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत डॉ.किशोर सांडव तसेच समर्थ झा उपस्थित होते.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई यांच्या हस्ते सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर व्याख्यात्यांनी त्यांनी भारतीय संस्कृती,मूल्ये,आरोग्य जपत विद्यार्थ्यांनी भविष्यात आत्मविश्वास मानसिक एकाग्रता कशी जपावी याचे मार्गदर्शन केले,यासाठी त्यांनी विविध उपक्रमाच्या गोष्टी,प्राणायाम, हास्यासन, संस्कृत श्लोक अशा अनेक क्लूप्त्यांचा वापर केला.
या व्याख्यानात इयत्ता 5 वी ते 9 वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते





