खारेपाटण बाजारपेठ येथे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

“पाण्याचे महत्व स्थानिक ग्रामपंचायतीला कळू नये हे दुर्दैव- महेश कोळसुलकर,शिवसेना उपतालुका प्रमुख
खारेपाटण ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी पेठ खारेपाटण येथील दरवाजा अर्थात बाजारपेठ नाका येथील जलवाहिनी फुटून यातील हजारो लिटर पाणी वाया गेले असून या घटनेला दोन दिवस होत आले तरी स्थानिक प्रशासनाचे अर्थात ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून जीवनाशी निगडित असलेल्या पाण्याचे महत्व स्थानिक ग्रामपंचायत व सत्ताधारी पक्षाला कळू नये हे स्थानिक नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा कणकवली उपतालुका प्रमुख श्री महेश कोळसुलकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण गावात जलजीवन मिशन अंतर्गत बऱ्याच ठिकाणी नवीन पाईप लाइन टाकून विविध भागात नळजोडणीचे काम घाई गडबडीत ठेकदारकडून पूर्ण करण्यात आले असून खारेपाटण बाजारपेठ येथील भारत बेकरी च्या समोर असलेली भूमिगत जल वाहिनी लिकेज् झाली असून यामुळे सुमारे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तर ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर बाजारपेठेत या लिकेज् झालेल्या पाईप चे पाणी सर्वत्र पसरून त्याला व ओहळाचे स्वरूप प्राप्त होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे भाजरपेठेत येणाऱ्या गणेशभक्तांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास शान करावा लागत आहे.
दरम्यान संबंधित जलवाहिनी फुटून आज दोन दिवस पूर्ण होत आले असून पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर स्थानिक ग्रामपंचायत दुर्लक्ष करुन येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख श्री महेश उर्फ गोटया कोळसुलकर यांनी केला असून सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी देखील श्री महेश कोळसुलकर यांनी केली आहे.
"खारेपाटण ग्रामपंचायतीची नळ योजनेची शिवाजी पेठ येथील जी जलवाहिनी फुटली आहे.ही बाब खरी आहे.मात्र बाजारपेठेत येणारे ग्राहक आणि गणेशचतुर्थी विसर्जन सोहळा लक्षात घेता बाजारपेठेत दुरुस्तीचे काम करताना नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये.या सर्व गोष्टीचा विचार करून दोन दिवसात संबंधित जलवाहिनीचे काम तातडीने दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.त्यामुळे विरोधकांनी पाण्याला पेटवण्याचे काम करू नये ती आग विझून जाईल."
--- सौ प्राची ईसवलकर
सरपंच,खारेपाटण
असे मत व्यक्त केले.





