शिवडाव गावातील विरजमान बाप्पांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले दर्शन.

कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत घेतला तीर्थप्रसादाचा लाभ.
कणकवली/प्रतिनिधी गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त सर्वत्र जगभरात कलेची दैवता असलेल्या आणि अखंड विश्वाचं दैवत असलेल्या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा केली जात आहे.कोकणात हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावे साजरा केला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री.अबीद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील शिवडाव गावातील आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत विरजमान बाप्पांचे दर्शन घेतले तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी मोठ्या उत्साहात अबीद नाईक यांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी कार्यकर्ते सतीश पाताडे उपस्थित होते





