उद्योजक रुपेश सावंत यांनी शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे घरी घेतले गणपती दर्शन

समाजसेवक व युवा उद्योजक श्री. रुपेश सावंत यांनी आज रविवार दिवशी भारतीय जनता पार्टी चे खारेपाटण विभाग शक्तिकेंद्र प्रमुख श्री. सूर्यकांत भालेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देत घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत खारेपाटण माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश कोळसुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योजक श्री. रुपेश सावंत यांनी आज खारेपाटण विभागातील अनेक घरघुती गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. चिंचवली येथे श्री. सूर्यकांत भालेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.





