सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्याचे काम भजन मंडळे करत आहेत–प्रभाकर सावंत

चिंदर येथे ग्राम स्वनीधीतून भजन मंडळाना साहित्य वाटप

सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्याचं काम सर्व भजन मंडळे करीत असतात म्हणून हा वारसा यशस्वीपणे पुढे चालावा यासाठी महायुतीच सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त भजन मंडळातील सदस्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी भा ज पा कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर जाऊन काम करण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथे केले.
चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत स्वनीधीतून गावातील भजन मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अशोक सावंत , भजन मंडळ संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे, बाबा परब ,भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, मांजरेकर, हिमाली अमरे, प्रकाश मेस्त्री, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, देवेंद्र हडकर, ग्राम पंचायत सदस्य, जानवी घाडीगावकर, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, पपू परुळेकर, मंगेश गावकर, दिपक सुर्वे, रवी घागरे, संतोष अपराज, दिगंबर जाधव, सर्व पोलिस पाटील आणि भजन मंडळातील लोक उपस्थित होते
यावेळी बोलताना संतोष कानडे यांनी भविष्यात सर्व भजन मंडळांना शासनाचा लाभ मिळावा व सांस्कृतिक भवन सिंधुदुर्गात व्हावे या साठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी अशोक सावंत व धोंडी चिंदरकर यांनी भजन मंडळांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!