जिल्हा परिषद शाळा नंबर पाच कणकवली येथे भाकरी डे उत्साहात

शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर यांची उपस्थिती
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रविंद्र खेबुडकर व शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्या प्रेरणेने आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्याचा विकास घडविण्यासाठी भाकरी डे हा उपक्रम राबविण्यात आला. कणकवली पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी केंद्रप्रमुख सभेमध्ये प्रत्येक शाळेत भाकरी डे साजरा करण्याच्या सूचना दिल्या.त्याप्रमाणे कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक,पालक शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळून उत्साहाने हा दिवस साजरा केला. भाकऱ्या तयार करताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. कणकवली व हुंबरठ प्रभागाच्या विस्तार अधिकारी प्रेरणा प्रदीप मांजरेकर यांनी जिल्हा परिषद शाळा कणकवली नंबर 5 येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भाकरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी शाळेच्या शिक्षिका कल्पना मलये व चव्हाण , पालक, स्वयंपाकी,मदतनीस उपस्थित होत्या.





