केंद्र शाळा मारुती मंदिर जाणवली येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जागवल्या आठवणी
केंद्रशाळा मारुती मंदिर जाणवली येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर यांनी माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित असणारे योगदान विषद केले. माजी विद्यार्थी ग्राम पंचायत सदस्य नितीन राणे, रुपेश परमाने यांनी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी रंजन राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री. प्रदीप मांजरेकर यांनी केले. श्री कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.





