कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख पदी दामू सावंत यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन

शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात खांदेपालट केला असून सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दामोदर उर्फ दामू सावंत यांच्यावर सोपवली असून, शिंदे गट शिवसेना स्थापन झाल्यापासून निष्ठेने कार्यरत असलेल्या दामू सावंत यांना पक्षनेतृत्वाने न्याय दिला आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!