पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भजनी कलाकारांना मिळणाऱ्या अनुदानाची आज सोडत-बुवा संतोष कानडे यांची माहिती.

सर्व भजनी मंडळानी उपस्थित राहून लाईव्ह सोडतीत सहभाग घेण्याचे आवाहन.
भजनी कलाकार संस्थेच्या आवाहनानंतर 850 प्रस्ताव प्राप्त.
कणकवली/मयूर ठाकूर
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या स्वनिधीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात येते.चालू वर्षी असे न करता प्रत्यक्ष अनुदान देण्याची मागणी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्याकडे केली.पालकमंत्री यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत अनुदान देण्यासंदर्भातले आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
या अनुषंगाने भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजन मंडळांनी आपले प्रस्ताव करावेत असे आवाहन केले होते. यानुसार जिल्ह्यातील 850 मंडळांनी सहभाग दर्शवला.
या अनुदानाची आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सभागृह येथे सायंकाळी चार वाजता लॉटरी पद्धतीत सोडत होणार असून प्रस्ताव केलेल्या सर्व जिल्ह्यातील मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी जिल्ह्यातील भजन मंडळांना अनुदान प्राप्त करून दिल्याबद्दल पालकमंत्री महोदय यांचे आणि या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याबद्दल सर्व भजनी मंडळाचे बुवा.संतोष कानडे यांनी आभार व्यक्त केले.





