कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची पहाटे घटनास्थळी धाव

नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

कणकवली तेली आळी येथील पाताडे कॉम्प्लेक्स च्या एका फ्लॅट मध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत रेडिमेड कपडे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग पहाटे 4.30 वाजण्याचा सुमारास लागली. घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांना माहिती दिली. नंतर त्यांनी लगेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना देत अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. तो पर्यंत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष घटनास्थळी होते. कणकवली तेली आळी येथे कस्टम ऑफिस समोर असलेल्या पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एका फ्लॅट मध्ये आज मंगळवारी पहाटे च्या सुमारास लागलेल्या आगीमुळे या फ्लॅट मधून धूर येऊ लागल्याने ज्याने ही आग पहिली त्याने आसपासच्या लोकांना या बाबत माहिती दिली. व त्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांना कळविण्यात आले. या फ्लॅटमध्ये आठवडा बाजाराला फिरून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आपले व्यवसायाचे लहान मुलांचे कपडे व अन्य रेडीमेड कपड्यांचे मटेरियल स्टॉक करून ठेवले होते. आठवडा बाजाराला व्यवसाय करण्याकरता तीन ते चार जणांनी येथे एकत्रित हे मटेरियल स्टॉक केलेले होते. दरम्यान या आगीमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, नगरपंचायत च्या आठ कर्मचाऱ्यांद्वारे अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी कणकवली शहरातील अनेकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. शॉर्ट सर्किटने आग लागली असण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!