“चिदा” यांचे निधन

कोचरे तालुका वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते गीत ,संगीत, चित्रकला, क्रीडा आदी क्षेत्रात संचार असलेले मितभाषी व्यक्तिमत्व सच्चिदानंद माधवराव जाधव यांचे काल राहत्या घरी निधन अकस्मितझाले.
“चिदा’ या नावाने ते सर्वश्रुत होते. मृत्यू समयी ते 59 वर्षांचे होते.

पहिल्या राष्ट्रपती पदक विजेत्या शिक्षिका स्वर्गीय मीराताई जाधव यांचे ते सुपुत्र तर कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या सुवर्णरेहा जाधव यांचे ते धाकटे बंधू होत.
स का पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट चे ते माजी संचालक होते. विक्रांत विशाल स्पोर्ट्स क्लब कोचरे च्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातही सच्चिदानंद सक्रिय होते .संगीताची आवड असलेले सच्चिदानंद हे उत्तम पेटी तबला वाजवत. किशोर कुमार, एच डी बर्मन, आर डी बर्मन ,गुलजार ही संगीतातील त्यांची दैवत होती.
नाट्यगीत गायला त्यांना आवडत असे.
क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ होता .स्वतः एक सुंदर चित्रकार होते .तंत्रज्ञानाची आवड होती. हा सगळा वारसा त्यांना वडिलांकडून मिळालेला तर पुरोगामीत्वाचा राजकारणाचा समाजकारणाचा वारसा त्यांना आईंकडून मिळाला. पुरोगामी विचारसरणी असलेले अभ्यासू आणि अतिशय मितभाषी असलेले प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून सच्चिदानंद जाधव यांची ओळख होती.
होमिओपॅथी या विषयातही त्यांचा व्यासंग होता परिसरात ते होमिओपॅथी सेवाही देत असत
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली बहीण असा परिवार आहे.

सच्चिदानंद यांच्या जाण्याने कोचरे गावाने आपली आणखी एक ‘ असेट” गमावली आहे अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे

error: Content is protected !!