कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ले येथील कासव महोत्सवात केला गेला सन्मान

आचरा : कासव संवर्धन व संरक्षण मोहिमेत मोलाचा सहभाग दर्शविणारया आचरा पिरावाडी येथील कासव मित्र सुर्यकांत आबा धुरी यांच्या कार्याची दखल घेत वेंगुर्ला येथील कासव महोत्सवात जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव केला गेला.
धुरी हे गेली काही वर्षे अथक परिश्रम घेऊन आचरा किनाऱ्यावर येणाऱ्या दुर्मिळ अश्या कासवाच्या प्रजातीपैकी ऑलिव्ह रिडले कासवाच सवर्धन करत आहेत त्यांनी आज पर्यंत ११ घरट्याच्या माध्यमातून सुमारे १५०० कासवांच्या पिलांचे संवर्धन करत नैसर्गिक समुद्री अधिवासात सोडले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते वेंगुर्ला वायंगणी येथील कासव जत्रेच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला..
या महोत्सवाला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या सोबत विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्याह वनपाल उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविक रेड्डी, यांनी केल.सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार वनपरीक्षेत्र अधिकारी अमृत शिदे यांनी मानले.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!