रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीकडून उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट प्रदान
सावंतवाडी प्रतिनिधि
रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी यांच्याकडून येथील उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट देण्यात आले. यात स्पीटिंग बॅग,स्पीटिंग कप, मल्टीपरपज बॅगचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे युनिट सुपूर्त करण्यात आले.
या युनिटचा मोठा फायदा क्षयरोग सारखे आजार असणाऱ्या रुग्णांना होतो. त्यामूळे वारंवार घराबाहेर थुकायला जायची गरज पडत नाही. यात थुंकल्यावर थुंकी जेल स्वरूपात बदलते त्यामुळे जिवाणूजन्य आजार पसरत नाही. याचा वापर ३० ते ४० वेळा करता येतो. मल्टीपर्पज बॅग मध्ये उलटी जेल स्वरूपात बदलते याचाही फायदा रुग्णांना होतो. या युनिटचा वापर कसा करावा याची माहिती यावेळी रोट्रॅक्टचे सावंतवाडी अध्यक्ष मिहीर मठकर यांनी दिली.यावेळी काही रूग्णांना याचे वाटपही करण्यात आले.
यावेळी रोट्रॅक्ट क्लबचे भावेश भिसे, विहंग गोठोसकर, पूर्वा निर्गुण, मेहुल रेड्डिज, धनराज पवार, सिद्धेश सावंत, रोटरी कल्बच्या अध्यक्षा विनया बाड,साईप्रसाद हवालदार, सुधीर नाईक तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.