रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या अध्यक्षपदी ॲड. राजेंद्र रावराणे

कणकवली रोटरी क्लब ची नवीन कार्यकारिणी जाहीर

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा रोटरी वर्ष २०२५–२६ करिता पदग्रहण सोहळा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे पार पडला. मावळत्या कार्यकारिणीकडून नव्या कार्यकारिणीकडे औपचारिकरित्या कार्यभार सुपूर्द करण्यात आला. पीडीजी आनंद कुलकर्णी यांनी अध्यक्ष पदाची मानाची कॉलर नूतन अध्यक्ष ऍड राजेंद्र राव राणे यांना प्रदान केली. रोटरी क्लब कणकवलीचे नवीन कार्यकारणी पदाधिकारी पुढील प्रमाणे वर्ष २०२५–२६: अध्यक्ष: अॅड. राजेंद्र रावराने, सचिव: सौ. सुप्रिया नलावडे, कोषाध्यक्ष: अॅड. गुरुनाथ पावसकर
कार्यक्रमाचे मान्यवर पाहुणे:
PDG रोटेरियन आनंद कुलकर्णी (प्रमुख पाहुणे), डॉ. विद्याधर तायशेटे (एरिया ऍड), AG रोटेरियन सचिन मदने (assistant governor ), ॲड. राजेंद्र रावराणे यांनी आपल्या भाषणात नवीन सामाजिक प्रकल्प, युवा सहभाग आणि रोटरीची बांधिलकी यावर भर दिला. तसेच रोटरीच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू जनतेची सेवा करणार असल्याचे देखील स्पष्ट केले. याप्रसंगी विशेष गौरव सोहळा:
देखील संपन्न झाला. कै. दादा कुडतरकर यांना “रोटरी भूषण पुरस्कार” मरणोत्तर प्रदान करण्यात आला. फोंडाघाट येथील उद्योजक श्री. दिनेश नांरकर यांना “बिझनेस अवॉर्ड” देऊन गौरवण्यात आले. दुर्मिळ रक्तगट B– चे नियमित रक्तदाते व पत्रकार राजन चव्हाण यांचा कम्युनिटी सर्विस व्होकेशनल अवॉर्ड देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. माधवराव खांबे ( पिटीशन रायटर दिवाणी न्यायालय कणकवली ) यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.
रोटरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे देखील मंचावर कौतुक करण्यात आले. यशस्वी आयोजनाची जबाबदारी इव्हेंट चेअरमन अॅड. दीपक अंधारी यांनी शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पाडली. रोटेरियन मेघा गांगण व रोटेरियन डॉ. सुहास पावसकर यांनी सत्राचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे समारोप करताना रोटेरियन सौ. सुप्रिया नलावडे यांनी सर्व मान्यवर, अतिथी, सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
एकूणच हा पदग्रहण सोहळा प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमास कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच जेष्ठ विधिज्ञ ॲड अजित भणगे अमोल सामंत, राजीव बिले,सिद्धार्थ भांबुरे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!