कलमठ मध्ये कथा नरहरी सोनाराची चलचित्र देखावा ठरला लक्षवेधी

अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने आयोजन
अखंड हरीनाम साप्ताह निमित्ताने श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, कलमठ येथे मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कलमठ बाजारपेठेच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये “कथा नरहरी सोनाराची” सादर करण्यात आली.
दिंडीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते. ढोल-ताशा, टाळ-मृदंग यांच्या गजरात सर्व ग्रामस्थ, महिला-पुरुष आणि लहानग्यांनी एकत्र येत जल्लोषात दिंडी नृत्य सादर केले. ग्रामस्थांनी याचे भरभरून कौतुक केले.
दिंडी व्यवस्थापनासाठी खालील ग्रामस्थांनी विशेष योगदान लाभले –
नंदकुमार हजारे (गुरुजी), प्रविण चिंदरकर सर, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, अनिकेत कांबळी, आबा मेस्त्री, मंथन हजारे, नील लोकरे, हर्ष हजारे आणि विठ्ठल रखूमाई मंदिर संस्था, कलमठ.
“कथा नरहरी सोनाराची” या दिंडीत विविध कलाकारांनी आपल्या भूमिकांद्वारे वातावरण मंत्रमुग्ध केले. या चलचित्र देखाव्यामध्ये भूमिका निभावणारे कलाकार :
अद्वैत पेडणेकर – विठ्ठल देव
आराध्य कांबळी– शिवशंकर
स्वरांश रेवडंकर – नरहरी सोनार
गौरांक सावंत, त्रिशा सावंत, स्वर कांचवडे, स्वयम गावडे – वारकरी
या सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेतून श्रद्धा आणि भक्तीचे सुंदर दर्शन घडवले.
ही दिंडी केवळ धार्मिक उत्सव नव्हती, तर ग्रामएकतेचे, भक्तिभावाचे आणि वारकरी परंपरेचे प्रतिक होती.
कलमठ ग्रामस्थांचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.