महाराजस्व अभियाना अंतर्गत हुंबरट मंडळाधिकारी येथे नागरिकांना दाखल्यांचे वितरण

विविध दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारून दाखले दिल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त
महसूल विभागातर्फे राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट ,2025 या कालावधीत “महसूल सप्ताह -2025” साजरा करण्यात येत आहे. त्यामधील एक टप्पा म्हणजे दिनांक 04 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येत आहे. नुसार आज मंडळ अधिकारी कार्यालय हुंबरट ता. कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी हुंबरट मंडळाचे मंडळ अधिकारी योजना सापळे, हुंबरट सजा चे ग्राममहसूल अधिकारी श्री. के. जी. चौगले, डामरे सजा चे ग्राममहसूल अधिकारी श्री. एन. एम. रावराणे, जाणवली सजाचे चे ग्राममहसूल अधिकारी श्री. डी. एन. डाके उपस्थित होते. यावेळी मंडळातील विविध लाभार्थी,खातेदार ,ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध योजनांची माहिती मंडळ अधिकारी श्रीम. योजना सापळे यांनी दिली. तसेच वाटप केलेले दाखले / स्वीकार केलेले अर्ज. खालीलप्रमाणे आहेत.
1.सातबारा / 8अ,फेरफार -52
2.उत्पन्न दाखले चौकशी अर्ज- 5
3.संजय गांधी / श्रावणबाळ योजना अंतर्गत अर्ज-1
4.वारस अर्ज-06
5.ई पीक पहाणी चे मार्गदर्शन केले.
6.AGRISTACK च्या नोंदणीबाबत सूचना / मार्गदर्शन. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.