ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी अर्जुन राणे यांची निवड

निवडी बद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला सत्कार
कणकवली तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या च्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राणे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मावळते अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी श्री राणे यांचे अभिनंदन केले. यानंतर संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, सखाराम सकपाळ, प्रमोद लिमये यांच्यासह अन्य उपस्थित होते.